शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला वारंवार अत्याचार अन् गर्भपातही…

नांदेड: नांदेड जिल्ह्यात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हदगाव तालुक्यातील तामसा येथे घडली आहे. नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून शिक्षकाने गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थींनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील केला आहे. घरच्यांना ही माहिती समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपी शिक्षका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला वारंवार धमक्या देत, तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. वारंवार संबंध ठेवल्यानंतर विद्यार्थीनी गरोदर राहिली. त्यानंतर गर्भपात देखील करायला लावला. दरम्यान, घडलेला प्रकार कुटुंबियांना लक्षात आला. यामुळे मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली.

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी, पालकांनी केली आहे.

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…

ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग…

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!