पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या साखळीचोराला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.

हमीद अफसर खान असे आरोपीचे नाव असून तो लोणी काळभोरच्या पठारे वस्तीत राहायला होता. तो मूळचा मध्यप्रदेशातील होशिंगाबाद येथील रहिवासी आहे. चोरटा मध्य प्रदेशातील इराणी टोळीतील असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एका ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तक्रारदार महिला २२ जानेवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत इतर एक वयोवृद्ध महिला होती. दोघी रस्त्यावरून चालत असताना दुचाकीस्वार चोरटा हमीद खान याने दुचाकीवरून येत तक्रारदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. ते चोरताना मंगळसूत्राचा अर्धवट भाग तुटून खाली पडला होता. त्यानंतर खान दुचाकीरून काही अंतर गेला. मंगळसूत्राचा अर्धवट राहिलेला भाग घेण्यासाठी पुन्हा वळून आला होता. त्याने ज्येष्ठ महिलेला धक्का दिला आणि अर्धवट तुटलेला भाग हिसकावून पळ काढला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

पोलिसांनी जवळपास १०० ते १५० ठिकाणांचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात पसार झालेला चोरटा हमीद खान असल्याचे निष्पन्न झाले. खान याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. खान याने महिलांकडील दागिने चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली.

पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…

धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!