Live Video: पोलिस आयुक्त पडले बेशुद्ध अन् राज्यपालांवर उठली टिकेची झोड…

तिरुवनंतपुरम (केरळ) : केरळचे राज्यपाल प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना शहराचे पोलिस आयुक्त थॉमसन जोस हे बेशुद्ध पडले. थॉमसन जोस बेशुद्ध पडले तेव्हा राज्यपाल तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला संबोधित करत होते. तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी लगेच त्यांना उचलून घेऊन गेले. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्ले देखील नाहीत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सकडून टिकेची झोड उठवली गेली आहे.

देशातील पोलिस दलावर नेहमीच ताण असतो. कोणता ही सण असोत किंवा कोणता कार्यक्रम पोलिस तेथे लोकांच्या संरक्षणासाठी तयार असतात. पण काही मोजक्या लोकांमुळे सगळ्याच पोलिसांचं नाव खराब होते, त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल चुकीचा समज निर्माण होतो. पण अनेक प्रसंगी पोलिस आपला जीव धोक्यात घालतात हे कोणीही विसरून चालणार नाही. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दिवसभर ऊन-पावसाची तमा न बाळगता उभे राहावे लागते. वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक व्हीआयपींसाठी पोलिस खात्याची जबाबदारी मोठी असते, तसेच त्यांच्या हातात सुरक्षेची जबाबदारी ही असते. ते व्हीआयपी गेस्ट जाण्याच्या तासनतास अगोदरपासून त्या जागेची तपासणी करतात, या मोठ्या लोकांच्या येण्यापर्यंत, त्यांची भाषणे करून निघून जाण्यापर्यंत पोलिसांना वाट पाहावी लागते.

पोलिसांना अनेक वेळा त्यांना कामाच्या ताणात पाणी, अन्न काहीही मिळत नाही. कितीही प्रकृती अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणे किंवा कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहणे, असे प्रसंगही पोलिस अधिकाऱ्यांसमोर येतात. केरळचे राज्यपाल भाषण करत असताना शहराचे पोलिस आयुक्त थॉमसन जोस बेशुद्ध पडले. ते ज्या प्रकारे उभे होते, त्यावरून ते खूप थकल्यासारखे वाटत होते. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्ले देखील नाहीत, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त थॉमसन जोस हे बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेत नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले. रिपोर्टर नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावरील सर्वाच चर्चेत व्हिडीओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reporter Live (@reporterliveofficial)

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!