विवाहित महिलेला पोलिस पाठवयचा मेसेज अन् करायचा कॉल…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका विवाहीत युवतीने पोलिस कर्मचारी छेड काढत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. हा कर्मचारी पोलिस स्टेशनचा प्रभारी असून तक्रार दाखल करायला आलेल्या युवतीला तो त्रास देत होता. या पोलिसावर विनयभंग केल्याचाही आरोप आहे. युवतीने खांडवाच्या एसपींना लेखी निवेदन दिले. त्यात हरसूद पोलिस स्टेशनचा टीआय अमित कोरी याच्यावर विनयभंग आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर सायबर स्टॉकिंगचादेखील आरोप केला आहे.

पीडित युवतीने आरोप सिद्ध करण्यासाठी टीआयने मोबाइलवर पाठवलेले काही व्हॉट्सअॅप मेसेज एसपींना दाखवले. युवतीच्या तक्रारीवरून पोलिस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी तातडीने कारवाई करून आरोपी टीआय अमित कोरीला तात्काळ निलंबित केले आहे. तसंच या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे सोपवली आहे.

पीडित युवतीने सांगितले की, ‘टीआय तिला वारंवार मेसेज करत होता. तिने त्याला फेसबुकवर ब्लॉक केले असता टीआय तिला इन्स्टाग्रामवर मेसेज आणि व्हिडिओ कॉल करू लागला. तिने दोन्ही प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केल्यावर टीआय तिच्या घरी येऊ लागला. सोबत राहण्यासाठी दबाव टाकू लागला. या कालावधीत इंदूरमध्ये एक फ्लॅट देऊन सोबत राहण्याचे आमिष देखील त्याने दाखवले. त्यास विरोध केला असता, त्याने तिचा हात पिरगाळला; पण तरुणीने त्याच्या हाताचा चावा घेऊन सुटका करून घेतली. या घटनेनंतर युवतीने एसपी कार्यालय गाठले.’

‘काही दिवसांपूर्वी माझ्या पतीशी वाद झाले. त्याबाबत तक्रार करण्यासाठी मी हरसूद टीआय अमित कोरीला भेटले. काही दिवसांनी पतीशी असलेले वाद मिटले. या कामामुळे माझा नंबर टीआयकडे गेला. त्यानंतर त्याचा वापर करून तो माझ्याशी चॅट करू लागला आणि मला त्रास देऊ लागला.’ पोलिस अधीक्षकांनी अमित कोरीला निलंबित केले असून, पुढील तपास सुरू आहे.

गोव्याला फिरण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न…

महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…

अधिकारी म्हणाला, तु मला खुप आवडतेस, माझ्या सोबत बंद केबिन मध्ये चल…

सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…

धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!