ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…
गुडगाव (हरियाणा): गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. या माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत. रेस्टॉरंटमध्ये नागरिकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या […]
अधिक वाचा...पिट्याभाईला टेकडीवरील मुलींचे फेसबुक लाईव्ह भोवणार?
पुणे : पुणे शहरातील अराई टेकडीवर अल्पवयीन मुलींनी नशा केल्याचा आरोप अभिनेते रमेश परदेशी यांनी केला होता. हे आरोप करताना रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, पण हेच फेसबुक लाईव्ह रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुली अल्पवयीन आहेत, पण तरीही त्यांचा चेहरा ब्लर न करता रमेश परदेशी यांनी […]
अधिक वाचा...Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…
जयपूर (राजस्थान) : एका वाहन चालकाला मोटार चालवत असानाना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि आठ जणांना चिरडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेदरम्यान हा अपघात झाला आहे. यात्रेत निघालेल्या बोलेरो मोटारीच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि मोटारीवरील नियंत्रण सुटले. काही […]
अधिक वाचा...भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘राज्य आमचे आहे, तुमची गुर्मी उतरवू,’ असे म्हणत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाही, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केले […]
अधिक वाचा...Video: खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…
रत्नागिरी : एक चिमुकली आणि एक प्रौढ व्यक्ती बैलगाडीखाली आल्याने गंभीर जखमी झाली, त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे खेड पोलिस ठाण्याचे हवालदार संपत गीते यांच्या माध्यमातून खाकी वर्दीतला देव त्या चिमुकलीच्या मदतीला धावल्यामुळे जीव वाचला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या हेदली (ता. खेड) […]
अधिक वाचा...Video: इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे: अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे बुधवारी (ता. ३) सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही युवकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. शिवाय, कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार […]
अधिक वाचा...Video: महिलेचा कॉन्स्टेबलमुळे वाचला महिलेचा जीव…
मुंबईः रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव धाडसी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महिला कॉन्स्टेबलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ही घटना घडली आहे. मुंबईच्या धावपळीच्या प्रवासात अनेकदा प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे पकडताना दिसतात. अनेकांना धावती रेल्वे पकडताना जीव गमवावा लागला आहे. शिवाय, अनेकदा […]
अधिक वाचा...Video: युवतीसोबत डान्स करणं होमगार्डला पडलं महागात…
मुंबईः लोकल ट्रेनमध्ये एका युवतीसोबत होमगार्डला डान्स करणे महागात पडले आहे. युवतीसोबत डान्स करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित गार्डवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. युवतीच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली पण होमगार्डला नोकरी गमवावी लागली आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक होमगार्ड कर्मचारी युवतीसोबत लोकल ट्रेनमध्ये नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. […]
अधिक वाचा...शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
बीडः बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. संबधित […]
अधिक वाचा...Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?
नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज सुरू असताना आज (बुधवार) दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार बसतात तिथे उडी मारली. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. संसदेत पकडलेल्यांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याची माहिती पुढे आली आहे. लातूरचा अमोल शिंदे आणि हिस्सारची नीलम सिंग अशी दोघांची […]
अधिक वाचा...
