पुणे! गौतमी पाटील हिच्या कारला भल्या पहाटे भीषण अपघात…
पुणे: मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात असलेल्या हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गौतमी पाटील हिच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. निलेश घायवळ याने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. पण, आता निलेश घायवळ याचे लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे: बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाने रेकॉर्ड वरील सराईत आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या अनुशंगाने श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ निरीक्षक यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याचे सक्त आदेश दिले. आदेशाचे अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार असे पो.स्टे हद्दीत गस्त […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांच्या सासु, नणंद आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने सासरच्या […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे : गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असून, त्याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळ याने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. […]
अधिक वाचा...पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. […]
अधिक वाचा...पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…
पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वर्षभरापासून न्यायालयीन लढाई […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांनी डोकं वर काढले असून, वेगवेगळ्या गँग, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी ‘गुडघ्यावर’ आणलं आणि त्यांची धिंड काढली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टी प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे. ६० दिवसानंतर कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांचा आता जेलमधून सुटका होणार आहे. पुण्यातील खराडीमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणीत […]
अधिक वाचा...पुणे! ससून हॉस्पिटलमधील 11व्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णाचा मृत्यू…
पुणे: ससून रुग्णालयात आज (गुरुवार) सकाळी एका मनोरुग्णाने 11व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय नावाच्या या रुग्णाला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी विजयने रेल्वेसमोर […]
अधिक वाचा...
