धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…
बारामती : मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ निघाला आहे. शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान युवकाने गमावला जीव…
पुणे : थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर भाटी (वय ३०, रा. शिक्षक कॉलनी वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयूर हा आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आला होता. […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…
मुंबई : नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, ट्रकचालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. एका जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. नवी मुंबईजवळच्या महामार्गावर एका पोलिसाला आंदोलकांनी घेरले आणि […]
अधिक वाचा...नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
रांची (झारखंड) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या आदित्यपूरच्या ६ मित्रांच्या वाहनाला आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, सहा मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला आहे. इंडिगो कारमधून ८ मित्र जात असताना मोटार खांबाला धडकली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच […]
अधिक वाचा...खुलेआम रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर पोलिसांची कारवाई…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावळी (सदोबा) परिसरात मागील अनेक दिवसांपासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू होती. पोलिसांनी कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत. सावळी (सदोबा) परिसरातून अवैध मार्गाने रेतीची वाहतूक यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, वाशिम व इतर ठिकाणी केल्या जात होती. या बाबतची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील […]
अधिक वाचा...रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी वर्णी पुन्हा लांबणीवर…
पुणे : महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरील वर्णी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी जाईल, असे सांगितले जात होते. पण, सध्या विवेक फणसाळकर […]
अधिक वाचा...विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…
वाराणसी : आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. वाराणसी पोलिसांनी अखेर तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली असून, पुढील तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सुहेल शर्मा यांना निरोप समारंभ!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरचे पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०३चे सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलिस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त […]
अधिक वाचा...अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…
अहमदनगर: अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अहमदनगर दौंड महामार्गावर आज (रविवार) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी […]
अधिक वाचा...सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): उत्तर प्रदेश या राज्यातून येवून पुण्यात राहुन पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जिजाबाई लक्ष्मण कदम (वय ७२ वर्षे, धंदा गृहीणी रा. निपाने वस्ती अमृत सिटी सोसायटी, नील बिल्डींग फ्लॅट […]
अधिक वाचा...
