पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सुहेल शर्मा यांना निरोप समारंभ!

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरचे पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०३चे सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलिस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

निरोप समारंभास अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलिस उप-आयुक्त, (गुन्हे), अमोल झेंडे, पोलिस उप-आयुक्त, परि-०२, पुणे, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे, विजय मगर, पोलिस उप-आयुक्त, मुख्यालय, रोहीदास पवार, नवनियुक्त पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ३ संभाजी कदम तसेच इतर अधिकारी / अमंलदार उपस्थित होते.

सुहेल शर्मा हे भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) म्हणून २०१२ रोजी रूजु झाले. त्यांनी चंद्रपुर या जिल्हयातून आपल्या पोलिस कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा येथे कर्तव्य बजावले आहे. २०१६ मध्ये उत्तर (चीन) चे बाजुने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या चढाई करणारे ते पहिले
(आय.पी.एस.) अधिकारी ठरले आहेत. या साहसा बरोबरच त्यांनी ऑक्सफर्ड या विद्यापीठातून कायदा व धोरणे यामध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळविली आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तालया मध्ये १५/११/२०२२ रोजी त्यांनी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ-०३, म्हणून कार्यभार स्वीकारला. पोलिस उप-आयुक्त म्हणुन कर्तव्य बजावित असताना त्यांनी परिमंडळ-०३ मधील संवेदनशील व महत्वाचे गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ठपणे करुन सदर गुन्हे उघडकीस आणणेकामी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांना २५/१२/२०२३ रोजी पोलिस आयुक्तालयाचे आस्थापनेवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी झालेल्या बदलीवर मोकळीक करण्यात आलेली आहे.

kashmir
kashmir

तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!

अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!

अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!

अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!