सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…

जळगाव: प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने आज (बुधवार) पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कापडे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, […]

अधिक वाचा...

एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन; धमकीत म्हटले की…

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी दाऊद आणि छोटा शकील गँगकडून देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी दिली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी वेगवेगळ्या […]

अधिक वाचा...

महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची (वय ३८) शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महालखेडा शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. महालखेडा येथे राहणारी महिला शेतात सकाळी काम करायला गेली […]

अधिक वाचा...

जळगावमध्ये कुंटणखान्यावर छापा, 10 ‘डर्टी आंटी’सह 60 युवती ताब्यात…

जळगाव : चोपडा येथे नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून, तब्बल ६० महिलांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, कुंटणखाना चालवणाऱ्या ११ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चोपडा शहरातील नगर पालिकेच्या पाठीमागील परिसरातच अवैधरित्या कुंटणखाना सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…

जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेत वाचवला युवकाचा जीव…

जळगाव : भुसावळ शहरात एका युवकाच्या डोक्यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून फरशीने हल्ला होत असतानाच पोलिस अधिकाऱ्याने धावत्या वाहनातून उडी घेतली आणि युवकाचा प्राण वाचवला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. भुसावळ शहरात एका युवकाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. या टोळक्याकडून […]

अधिक वाचा...

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

जळगाव : चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान आज (शनिवार) पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जाखमी झाले होते. त्यांना एकूण […]

अधिक वाचा...

विवाहित महिलेने घेतला जगाचा निरोप; गुन्हा दाखल…

जळगाव: मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. वर्षा गणेश सूर्यवंशी (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्षा हिचे ३ वर्षापूर्वी […]

अधिक वाचा...

भरधाव कारने चौघांना चिरडले विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू अन्…

जळगाव : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे गुरुवारी (ता. ४) सायंकाळी घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात एका विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा […]

अधिक वाचा...

अक्कलकोटवरुन परतताना कार दरीत कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू…

जळगाव : अक्कलकोटवरुन परतताना भाविकांची कार दरीत कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. देवदर्शनावरुन परतत असताना चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीला अपघात झाला आहे. गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रविवारी (ता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!