आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई केली आहे. दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील […]

अधिक वाचा...

IPS महिला अधिकाऱ्याची फसवणूक; लग्नानंतर खरी माहिती उघड…

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलात तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर यांची एकाने फसवणूक केली आहे. श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली. शिवाय, लग्नानंतर त्याची खरी माहिती उघड झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. कानपूरच्या रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकुर या सध्या उत्तर प्रदेश पोलिसात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. […]

अधिक वाचा...

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे शहरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून बुधवारी (ता. […]

अधिक वाचा...

महेंद्र सिंह धोनीवर टीका करणे भोवले; आयपीएस अधिकाऱ्याला शिक्षा…

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धोनीच्या बाजूने निकाल देताना आयपीएस अधिकारी संपथ कुमार यांना शिक्षा सुनावली आहे. मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीत आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर […]

अधिक वाचा...

पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!

पुणे (संदीप कद्रे) : पुणे शहरचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी दिले. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलिस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची […]

अधिक वाचा...

आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…

हैदराबाद : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली वकिली सोडून ईशा सिंह या आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. त्यांचे वडील महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी निवृत्तीनंतर वकिली सुरू केली होती. वडिलांप्रमाणेच आयपीएस व्हायचे, असा निर्धार केलेल्या ईशा सिंह यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस ॲकॅडमीमध्ये ७५ आरआर बॅचची पासिंग […]

अधिक वाचा...

गुवाहाटीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मराठी पोलिस अधिकाऱ्याकडे…

आसाम : महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून 40 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे ज्यावेळी गुवाहाटीत पोहचले त्यावेळी तेथील कायदा – सुव्यवस्था पाहण्याची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्यावरच होती. ते अधिकारी म्हणजे सहायक पोलिस महानिरीक्षक डॉ. धनंजय घनवट. ते मुळचे बारामती येथील रहिवासी आहेत. डॉ. धनंजय घनवट हे आसाम पोलिस दलात सहायक पोलिस महानिरीक्षक […]

अधिक वाचा...

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

तेजस्वी सातपुते या 2012 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची आतापर्यतची कामगिरी पाहिली तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तव्य कठोरपणे राबवत असतानाच, पोलिस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यातून समाजामध्ये पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच, पोलिस कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचावण्यासाठीही खूप चांगल्या पद्धतीने मदत […]

अधिक वाचा...

वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….

मुलगी शिकली, प्रगती झाली… हे वाक्य चांगलचं लोकप्रिय आहे. या घोष वाक्याला साजेशी कृती केली तर याचा जीवनाला अर्थ आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही. याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर पोलिस उपअधीक्षक डॉ. शितल खराडे-जानवे यांनी यशाला […]

अधिक वाचा...

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!