Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…
पुणे (तेजस फडके) : तावशी (जि. पुणे) या गावातील स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणून वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तम कामगिरी केली आहे. तावशी (ता. इंदापुर, जि. पुणे गाव) गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमी मध्ये १६/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून त्याच्या कडेल जास्त प्रमाणात […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
पुणेः पत्नीचा विरह सहन न झाल्याने तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी पतीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथे घडली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला आहे. स्वप्निल सुतार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. स्वप्निल सुतार यांच्या श्रावणी या पत्नीचा दोनच दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…
पुणेः गर्भलिंगचिकित्सेनंतर खाजगी डॉक्टरकडून गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून टाकले. या प्रकरणात अतिरक्तस्त्रावामुळे २३ वर्षांच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. वडापूरी (ता.इंदापूर) येथे २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या या घटनेस कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन त्या विवाहितेचा पती, सासू व सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पती व सास-याला अटक करण्यात आले आहे. सासु फरार आहे. राहुल […]
अधिक वाचा...इंदापूर हादरले! हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या…
पुणे: इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या युवकाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १६) रात्री घडली आहे. अविनाश धनवे (रा. आळंदी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…
पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला असून, या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे. म्हसोबावाडी गावात विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये […]
अधिक वाचा...