विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्याला दुचाकीवर बसून घेऊन गेला अन् पुढे…

जळगाव: अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे. तुषार चौधरी या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, मृत तुषार याची पत्नी आणि सागर चौधरी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे.

पोलीसांनी मृतदेह आढळून आलेल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, तुषार आणि सागर चौधरी हे एकाच मोटार सायकलवरून जाताना आढळून आले होते. या घटनेचा आधार घेत पोलिसांनी तुषारची पत्नी आणि तिचा प्रियकर सागर चौधरी यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी या घटनेची कबुली दिली आहे. तुषार चौधरी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित सागर चौधरी आणि तुषारच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, तुषार चौधरी या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. पण, पोलिसांनी तपास करून गुन्हा उघड केला आहे.

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!