केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड…

जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली आहे. मुक्ताईनगरच्या यात्रा महोत्सवात रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणींसोबत गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनाविरोधात तिचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड झाल्याने खरंच महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने चार महिन्यांच्या चिमुकलीचा पाळण्यातच आवळला गळा…

मुंबईः घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची पाळण्याची दोरीने गळा आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे या बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने निष्पाप 4 महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ […]

अधिक वाचा...

स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी (ता. २८) कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पीडित युवती (वय २६) आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील आयटी परिसरातून परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका…

पुणे : पुणे शहरातील आयटी हिंजवडी परिसरातून चार परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. याप्रकरणी परदेशी दलाल महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. थायलंडमधील चार युवतींना जास्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोशल मीडियावरून या युवतींचे फोटो पाठवून लोणावळ्यात व्हिला बुक करून […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज […]

अधिक वाचा...

एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेली येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम युवतीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर युवतीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित युवतीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…

ठाणे: ठाण्यात एका गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने तिची आई आणि आजीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशस्वी पवार (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यशस्वी हिचा आई आणि आजी सांभाळ करत होत्या. यशस्वी जन्मत:च अपंग आणि गतीमंद होती. गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना […]

अधिक वाचा...

पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…

पुणे: पिंपरी परिसरातील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली होती. पण पीडित मुलीने जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवलेल्या एका मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आले आहे. सहिती रेड्डी (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावरून केली युवतीसोबत मैत्री अन् पुढे…

तिरुअनंतपुरम (केरळ): एका प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावर मैत्री करून युवतीला आपल्या जाळ्यात ओढले. पुढे त्याने युवतीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. मोहम्मद निशाल (वय २५) असे अटक […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार…

वर्धा : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा मित्र तिला 10 फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!