पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. या अपघात प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोर्शे ही अलिशान […]
अधिक वाचा...पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…
नागपूर: नागपूरच्या कळमना पोलिस चौकीमध्ये काही पोलिस कर्मचारी चक्क सिगारेट ओढताना आणि जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. संबंध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओत दिसणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कळमना पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी वर्दीवर सिगारेट ओढत असून जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर कळमना ठाण्यातील या व्हिडीओमध्ये दिसणारे […]
अधिक वाचा...रक्षाबंधनला माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; नवरा जोरात चावला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. नवऱ्याने रागाच्या भरात चावा घेत पत्नीचे नाकच तोडले. बर्फात नाक ठेवून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. देहात कोतवाली परिसरातील बनियानीपुरवा येथे राहणारी अनिता (वय 27) हिचे बेहता गोकुळ येथे माहेर आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी ती […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…
पुणे: पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांकडून काही पोलिसांना प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी संलग्न केले जाते. मात्र, सोयीने संलग्नता देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय तरतूद नाही. त्यामुळे बदली झालेल्या पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवावे, असा आदेश अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढला होता. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी यांना सोयीस्कर होईल या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…
जामनेर (जळगाव) : रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेला रात्रीच्या वेळी घरामध्ये सर्पदंश झाला. या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील गोंदेगाव तांडा येथील पुजा काशिनाथ पवार (वय २१) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गोंदेगाव येथे पती, […]
अधिक वाचा...आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…
आळंदी (पुणे): आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका बारा वर्षीय मुलावर महाराजाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला आरटीओकडून…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर केलं असता तातडीनं जामीन मंजूर करण्यात आला होता. […]
अधिक वाचा...धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह झुडपामध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. परप्रांतीय व्यक्ती संतोष […]
अधिक वाचा...पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…
पाटणा (बिहार) : भागलपूरच्या पोलिस लाइनमध्ये 13 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस कॉन्स्टेबल नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर-सीबी-38 मध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट हस्तगत केली आहे. यामध्ये अनैतिक संबंध आणि भांडणांमधून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत […]
अधिक वाचा...पत्नीने केला नवऱ्याचा हॉटेलपर्यंत पाठलाग अन् दोन युवतींसोबत…
भुवनेश्वर (ओडिशा) : पत्नीने एका हॉटेलच्या रूममध्ये पतीला दोन युवतींसोबत रंगेहात पकडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नवरा आणि दोन्ही मुलींना इन्फोसिटी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पत्नीला नवऱ्यावर संशय होता. एक दिवस पत्नी पाठलाग करत हॉटेलमध्ये पोहोचली होती. पीडित पत्नीने इन्फोसिटी पोलिसांशी संपर्क साधून पतीच्या कृत्यांची माहिती दिली. माहिती […]
अधिक वाचा...
