
धक्कादायक! मठात राहणारी अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर…
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील रेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर सुरेंद्र मुनी व त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी सातत्याने अत्याचार केला असून, मुलगी गरोदर राहिल्याची माहिती पुढे आली आहे. शिरखेड पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.
पीडित मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले असून, खळबळ उडाली आहे. शिरखेड पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या लैंगिक शोषणात सदर अल्पवयीन युवतीची मावशीने देखील आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे.
पीडित मुलगी ही तिच्या मावशीसोबत मठात राहात होती. पीडित मुलगी ही मठातील इतर मुलींसह, महिलांसोबत झोपली होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास मावशीने पीडितेला झोपेतून उठवले आणि नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली. त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. युवतीने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
पिडित युवतीने मावशीला याबाबत सांगितल्यानंतर कोणालाही काहीही सांगू नको, असे म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यापासून रोखले. दोघांनी पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले. एक दिवस मुलगी गरोदर असल्याचे समजताच मावशीने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा पिडीत मुलीने डॉक्टरांना सर्व काही सांगितले. डॉक्टरांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मठातील बाबाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, शिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्रमुनी तळेगवावकर, बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे.
सख्ख्या भावासह मामाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; राहिली गरोदर…
दहावीत शिकणारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का; आरोपी निघाला…
नोकरी वाचवायची असेल तर मला खूश ठेव म्हणाला अन् गरोदर राहिल्यावर…
नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…
संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…

