
पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
बीड : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे.
सुभाष दुधाळ हे बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी रेल्वे स्थानकातील रुळावर मृत पोलिस अधिकाऱ्याच्या शरीराचे दोन तुकडे आढळून आले. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सुभाष दुधाळ यांची काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत होते. शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
उड्डाणपूला जवळील रेल्वे पटरीवर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असे असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. मृत धुमाळ पोलिस खात्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुणे येथे सीआयडी पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून कौटुंबिक कारणाने त्यांनी जीवन संवल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

