
सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबाला केली बेदम मारहाण…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोठरे गावात घडली आहे. सावकाराच्या गुंडांनी कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित कुटुंब आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्याने सावकाराने वसुलीसाठी गुंडांना पाठवले. गुंड थेट पीडित कुटुंबाच्या घरात घुसले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कुटुंबाला स्वत:चा बचाव करता आला नाही. हल्ल्यात घरातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असून, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये गुंड कुटुंबातील सदस्यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पीडित कुटुंबाने वडनेर खाकुर्डी पोलिस स्थानकात सावकारासह त्याच्या गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
कोल्हापूर! पत्नीला पळवून नेल्याचा भयंकर बदला, मध्यरात्री निर्घृण हत्या…
हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…
बारामती! भावकीच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या…
उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…

