
शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…
लंडनः विद्यार्थ्यांशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून एका शिक्षिकेला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. होली राउज स्विनी (वय ३७) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे. शिवाय, तिने शिकवणीनंतर विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्या विद्यार्थ्याचे वय लैंगिक संबंध ठेवण्याएवढं नाही हे माहिती असूनदेखील तिने हे कृत्य केले आहे.
पीडित विद्यार्थ्याच्या आईने विद्यार्थ्याचे व्हॉट्सअॅप तपासले आणि हे प्रकरण उघडकीस आले. ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याला अश्लील मेसेज पाठवत असे. ते पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईने शिक्षिकेची पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी शिक्षिकेचा लॅपटॉप तपासला. त्यानंतर तिने विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचे आणि लैंगिक गैरवर्तन केल्याचे कबूल केले.
संबंधित शिक्षिका गणित विषय शिकवायची. तिने पोलिसांना सांगितलं, की गेल्या बऱ्याच काळापासून ती मानसिक समस्येला तोंड देत होती. न्यायालयाने त्या शिक्षिकेला सहा वर्षांची शिक्षा तर सुनावलीच; पण भविष्यातही तिला विद्यार्थ्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ‘शिक्षिकेच्या या कृत्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीवर खूप विपरीत परिणाम झाला आहे, याची मला कल्पना आहे. मला अशी आशा वाटते, की या शिक्षिकेला शिक्षा मिळाल्याने विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल.’
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…
Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…
पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…
प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग…
शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…

