
पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक धनाजी भरत वणवे (वय 42) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कात्रज मंडई चौकात बुधवारी (ता 10) सायंकाळी 6.45 वाजता घटना घडली. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
पोलिस नाईक धनाजी वणवे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमनासाठी कात्रज मंडई चौकात तैनात होते. अचानक त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. तात्काळ उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना कात्रज येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे पोलिस नाईक धनाजी भरत वणवे यांचा मृत्यू झाला.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांनी पोलिस सेवेत अत्यंत जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि शिस्तप्रियतेने आपले कर्तव्य बजावले. ट्रॅफिक नियंत्रणासारख्या कठीण कामात देखील त्यांचा नेहमी सकारात्मक आणि शांत दृष्टिकोन असायचा. त्यामुळे सहकारी पोलिसांमध्ये ते लोकप्रिय होते. धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. ते पोलिस नाईक म्हणून कर्तव्य बजावत होते. शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ते कर्तव्यदक्षतेने नेहमी कार्य करत असायचे. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनाजी वणवे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्य बजावत असताना प्राण गमावणारे धनाजी वणवे हे खऱ्या अर्थाने समर्पित आणि शौर्यवान पोलिस अधिकारी होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या…
पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

