
पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी केअर संस्थेमार्फत सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…
पुणे (संदीप कद्रे): पुणे गणेशोत्सव दरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असून, त्यांच्या परिश्रमामुळे यंदाही हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला. सर्वच पोलिस बांधवांना हा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीय समवेत साजरा करता येईलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे स्थित केअर संस्थेमार्फत पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक सोहळ्याचे पंडित भीमसेन जोशी सभागृह (औंध, पुणे) येथे 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान भक्ती व सुगम संगीताचे सादरीकरण तालमणी खंडेराव मुळे यांनी केले. त्यांच्या या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्याचप्रमाणे केअर संस्थेच्या विविध उपक्रमांतर्गत विशेष कामगिरी बजावलेल्या कलाकारांपैकी डॉ. विजय पाटील, कु. अनिका कानडे, चि. अन्वित रणसिंग, व मराठी इंडियन आयडल फेम सुरेश कदम यांचे गायन तर कु. अनुष्का घोडेकर, कु. आसावरी फडणीस, कु. अक्षता खानविलकर, वेदांता अकॅडमीच्या श्रुती झनकर शिंदे यांच्या विद्यार्थिनी व कथक अलंकार मंजुषा हंकारे यांचे नृत्य सादरीकरण करण्यात आले. पुणे व परिसरातील कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देऊन कला व संस्कृती संवर्धनातून पर्यावरण संवर्धन विषयी जनजागृती करण्याचा मानस संस्थेचा असल्याचे माहिती यांनी संस्थेच्या जया ठेंगे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, पिंपरी चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनय चौबे, पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अंकित गोयल यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनातर्फे शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व श्री. राखेलकर पोलिस निरीक्षक पुणे, यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अरविंद माने यांनी पोलिस प्रशासनामार्फत मनोगत व्यक्त करून आभार मानले व संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधव यांनी आपल्या कुटुंबीय समवेत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर वारेगावकर व क्षितिज कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रज्ञा डांगे व डॉ. महेशकुमार वडदरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. भाग्यश्री पायगुडे यांनी केले.
नमो हॉस्पिटल तर्फे पोलिसकाकांची मोफत आरोग्य तपासणी…
पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…