शिक्षकाने मेसेज करून विद्यार्थिनीला बोलावले अन् जबरदस्तीने मारली मिठी…

मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरात एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवळूखकर (वय ४७) असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी (वय १६) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी गणेश देवळूखकर याने पीडितेला व्हॉट्सॲपवर मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले होते. ती भेटीसाठी गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून तिला पाठीमागून ओढले. त्यानंतर जबरदस्तीने मिठी मारून तिचा विनयभंग केला आणि लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या प्रकारानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गणेश देवळूखकर याच्याविरुद्ध BNS कलम ७५(३) तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून ताब्यात घेतले आहे.

शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…

जळगाव जिल्ह्यात शिक्षकाचा चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार; पोट दुखू लागल्याने…

विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप…

Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!