रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)

रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे पोलिस दलात दाखल झाल्या आणि खेळासह पदकांचा प्रवास पुढेही चालूच राहिला. पुणे शहर पोलिस दलातील नियंत्रण कक्षात त्या सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या असलेल्या रेश्मा पाटील यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी थोडक्यात…

रेश्मा पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोरोची हे गाव. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक. सहा बहीण भाऊ. कुटुंबामध्ये कोणीही क्रीडा क्षेत्रामध्ये नसतानाही शाळेतील पीटीच्या शिक्षकामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली आणि त्या संधीचे सोने करत गेल्या. राष्ट्रीय, राज्य आणि पोलिस दलातील विविध पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. रेश्मा पाटील आणि पुरस्कार हे एक समीकरणच झाले आहे. जमिनीवर राहून काम करत राहणे आणि ध्येयाकडे एकनिष्ठ होऊन जिद्दीने वाटचाल करत आहेत.

आई-वडील हे शेती करत. सहा भावंडांमध्ये रेश्मा या सर्वांत लहान. वस्तीपासून शाळा साडेतीन किलोमीटर लांब. वाहनाची सुविधा नसल्यामुळे चालत जावे लागायचे. किमान सात किलोमीटर चालणे व्हायचे. शिवाय, घर आणि शेतीमधील कामे. इयत्ता आठवीमध्ये असताना प्रथम खो-खो खेळल्या आणि आयुष्याला एक कलाटणी मिळाली. इयत्ता आठवीपासून सुरू झालेला पदकांचा प्रवास आजही कायम आहे.

शिक्षण…
१ ते १० – मोरझाई विद्यालय मोरोची. ता. माळशिरस, जि. सोलापूर.
११ ते १२ – कन्या प्रशाला नातेपुते. जि. सोलापूर
पदवी – शाहू विद्यालय, पुणे.
पोलिस दलात नोकरी लागल्यानंतर कला शाखेमधून पदवी घेतली. शिवाय, बीपीएड आणि एनआयएसचा डिप्लोमा पूर्ण केला आहे.

खो-खो स्पर्धा…
मोरझाई विद्यालय मोरोची येथे इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असताना पीटी शिक्षक कै. अशोक गोरे, साळुंखे सर, माने मॅडम यांनी खो-खो खेळासाठी टीम निवडली होती. या टीम मध्ये रेश्मा पाटील यांची निवड करण्यात आली होती. पहिल्यापासून चालण्याची सवय असल्यामुळे त्यांनी खो-खो खेळताना चुणूक दाखवून दिली. शाळेला तालुका स्तरावर विजेतेपदक मिळवून दिल्यामुळे खेळाबरोबरच पळण्याची आवड निर्माण झाली.

चपलेविना धावल्या…
शाळेमध्ये १४ वर्षांच्या असताना १९ वर्षांच्या गटामध्ये सहभागी झाल्या होत्या. पळण्याच्या शर्यतीमध्ये सहभाग घेतला त्या वेळी पायामध्ये काहीच नव्हते. अनवाणी पायाने धावल्या आणि प्रथम क्रमांकाने विजयी झाल्या. राज्य पातळीवर पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक मिळवले. पुढे शाळेच्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी होत गेल्या. तालुका, जिल्हा, विभागीय, राष्ट्रीय पातळीवर खेळात सहभागी होत राहिल्या आणि पुरस्कार मिळवीत राहिल्या.

पुरस्कारविजेत्या…
राष्ट्रीय पातळीवर १९ वेळा सहभाग. सात सिल्व्हर, तर दोन ब्राँझ पदके मिळवली आहेत.
राज्य पातळीवर १८ वेळा सहभाग. १२ सुवर्णपदकं, १० सिल्व्हर तर ७ ब्राँझ पदके मिळवली आहेत.
पोलिस दल – २०११ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या. अॅथलेटिक्समधून पोलिस दलातील पहिल्या पुरस्कार विजेत्या ठरल्या आहेत.
पोलिस दलाकडून २००७ पासून खेळत असताना राज्य पातळीवर १७ पुरस्कार मिळविले आहेत.

पोलिस दलात दाखल…
शाळेकडून खेळत असताना पुणे शहरातील बालेवाडी येथे राहत होत्या. बालेवाडी येथे कँम्पमध्ये राहण्याची व्यवस्था होती. पोलिस भरतीची जाहिरात पाहिली आणि फॉर्म भरला. परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात २००७ मध्ये पोलिस दलात भरती झाल्या. कुटुंबाला पोलिस दलाचा कोणताही वारसा नसताना केवळ खेळामुळे पोलिस दलात भरती झाल्या. शिवाय, पोलिस दलात खेळामुळे कमी वयात लवकर बढती मिळत गेली, असेही रेश्मा पाटील सांगतात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!