नाशिकमध्ये कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका: संदिप कर्णिक

नाशिकः सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. कोणत्याही आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकू नये, असे बेकायदेशीर कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटले आहे.

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णीक यांनी तात्काळ कारवाई आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे आभार मानले जात आहेत. नाशिकमधील पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती. यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतले. आता या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आले होते. ज्याने ते प्रकाशित केले होते, त्याला अटक झाली आहे. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे. काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढले आहे. पोलिस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे. ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे. त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलिस घेत आहे.

सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी पूर्व वैमनस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे. मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का? याचाही शोध घेतला जात आहे. यापुढे देखील, असे प्रयत्न होऊ शकतात. पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर ते पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमज निर्माण करून दंगलसदृश्य स्थिती निर्माण करायची, असे यापुढेही होऊ शकते. म्हणून गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. पोलिस महासंचालक आणि एसआयडीला वस्तुस्थिती सांगितली आहे. काही राजकीय नेत्यांनी काल ते पत्र ट्विट केले आहे. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल. कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आले, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नाशिकला जो प्रकार घडला त्याची तात्काळ दखल घेऊन आरोपीस अटक करुन कारवाई केल्याबद्दल पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदन केले आहे.

नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!