नागपूरमध्ये पती-पत्नीचा रस्त्यावरील नग्नावस्थेतील व्हीडिओ व्हायरल…

नागपूर : नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये पती-पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी-पतीच्या मागे धावताना दिसत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला लोक असूनही त्याकडे लक्ष न देता हे दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालताना दिसत आहे पती घराबाहेर नग्न निघाला असता पत्नीही त्याच्या मागे तशाच अवस्थेत निघाली. पती पुढे पुढे जाताना दिसतोय. तर पत्नीदेखील नग्नावस्थेतच त्याच्या मागे मागे धावताना दिसत आहे. लक्ष्मीनगर चौक ते माटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (ता. 27) रात्री ही घटना घडली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

व्हायरल व्हिडीओची पोलिसांनीही तत्काळ दखल घेतली. बजाज नगर पोलिसांनी या दाम्पत्याचा शोध घेत त्यांना पोलिस ठाण्याला बोलावले. तेव्हा कुटुंबियांकडून ते दोघे पती-पत्नी मानसिक रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. या मनोरुग्ण दाम्पत्याला कुटुंबियांनी उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रियकर-प्रेयसी धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करताना दिसत होते. विशेष म्हणजे हे दोघेही ड्रायव्हिंग सिटवर बसून हा प्रकार करत होते. नागपूरच्या धरमपेठ भागात ही घटना घडली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीताबर्डी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सूरज राजकुमार सोनी हा सनदी लेखापाल आहे. तर त्याची प्रेयसी अभियंता आहे.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!