हिंजवडी IT पार्कमध्ये NSG अन् अमेरिकेचे कमांडोचा ताफा अचानक धडकला अन्…

पुणे: ‘हिंजवडी आयटी पार्क’मध्ये बुधवारी (ता. ५) अचानक मोठा पोलिस बंदोबस्त तैनात झाला. त्यासोबतच १०० हून अधिक ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (NSG) कमांडोंचा ताफा धडकला. अचानक आलेल्या या लष्करी ताफ्यामुळे आणि मोठ्या हालचालींमुळे हिंजवडी परिसरात एकच खळबळ उडाली. IT पार्क अचानक छावणीसारखे का दिसू लागले? नक्की काय घडले होते? याचा उलगडा होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जागतिक दर्जाच्या या आयटी पार्कच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेण्यासाठी एनएसजीकडून तब्बल पाच तासांचे विशेष ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता सुरू झालेली ही मोहीम रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित कंपनीच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्तात एनएसजी कमांडो दाखल झाले. कोणत्याही आपत्कालीन किंवा दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी, सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, तत्परता आणि त्यांचा क्विक रिस्पॉन्स तपासणे हा या भव्य सरावाचा मुख्य उद्देश होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तपास आणि सुरक्षेच्या या थरारक प्रात्यक्षिकांमध्ये अमेरिकेचेही १७ विशेष कमांडो सहभागी झाले होते. हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील प्रमुख कंपन्या आणि दररोज हजारो कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य धोके टाळण्यासाठी कमांडोंनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर करून चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवली. या संपूर्ण मोहिमेत स्थानिक पोलिस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनीही सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, आयटी पार्क परिसरात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्याचे ताफे आणि शस्त्रसज्ज कमांडो उतरल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीला उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा केवळ सुरक्षेचा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुरक्षा यंत्रणांच्या या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे आयटी पार्कमधील सुरक्षेबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…

पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!