‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर अन् पुण्यातील व्यावसायिकाची कोट्यावधींची फसवणूक…

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बनावट ‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या व्हिडिओद्वारे अल्पावधीत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व्यावसायिक हे काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ दिसला. या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री एका ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मची जाहिरात करत असून, त्यात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगताना दिसत होत्या. सायबर गुन्हेगारांनी AI Deepfake Technology चा वापर करून अर्थमंत्र्यांचा आवाज आणि चेहरा हुबेहूब तयार केला होता. व्हिडिओ खरा वाटल्याने व्यावसायिकाने त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

लिंकवर क्लिक केल्यानंतर चोरट्यांनी व्यावसायिकाकडून ओळख पटवण्यासाठी आधार कार्डसह इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली. दुसऱ्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने टेलिग्रामवर संपर्क साधून स्वतःला नामांकित ट्रेडिंग कंपनीचा ‘रिलेशनशिप मॅनेजर’ असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. चोरट्यांनी व्यावसायिकासाठी एक ऑनलाइन ट्रेडिंग खाते तयार केले. सुरुवातीला त्यांना 20341 रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले. ही रक्कम गुंतवल्यानंतर लगेचच सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर 1000 रुपये पाठवले आणि हा गुंतवणुकीवरील पहिला नफा असल्याचे भासवले. यामुळे व्यावसायिकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला.

विश्वास बसल्यानंतर 2 जून ते 23 जुलै या कालावधीत सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी व्यावसायिकाकडून तब्बल 36 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 1 कोटी 7 लाख रुपये जमा करून घेतले. आरोपींनी व्यावसायिकाला ‘SpaceX’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या प्री-लिस्टिंग शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट-तिप्पट नफा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. सायबर चोरट्यांनी तयार केलेल्या बनावट ॲप व्यावसायिकाची गुंतवणूक आणि नफा सातत्याने कोट्यवधी रुपयांमध्ये वाढताना दिसत होता. व्यावसायिकाने खात्यात दिसणारा नफा आणि मूळ गुंतवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी विविध कर आणि शुल्काची मागणी करण्यास सुरुवात केली. रक्कम काढता येत नसल्याचे आणि आरोपींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. व्यावसायिकाने तात्काळ ‘राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल’वर तक्रार नोंदवली. त्यानंतर पुणे सायबर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुणे शहरात मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक…

पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…

नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!