पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या विदेशी नागरिकाला पकडले असून, त्याच्या ताब्यातून तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली.

हसेनी मुबीनी मीचॉगा (३५, मु. रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी असून कामानिमित्ताने भारतात आला आहे. उंड्री याठिकाणी तो सध्या राहत होता. परंतु अंमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिली.

संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, शैलेश बलकवडे अप्पर पोलिस आयुक्त, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, पो उप निरीक्षक दिगम्बर चव्हाण, योगेश मांढरे, साहिल शेख, अजीम शेख, शिवाजी घुले, प्रशांत बोमादांडी, संदीप शेळके संदीप जाधव, दिनेश बाष्ठेवाड, दिशा खेवलकर यांनी केली आहे.

पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या धडाकेबाज कारवाया…

‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!