पुणे शहरात बॉक्समध्ये सापडला युवकाचा मृतदेह…

पुणे : हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये आज दुपारी ही घटना उघडकीस आली. एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करण्यात आला. त्यानंतर हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी हा बॉक्स फेकून देण्यात आला होता. स्थानिकांना जेव्हा हा बॉक्स आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठे यश आलं आहे. याप्रकरणात एका संशयिताला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दोघांना नागपूर येथून. साक्षिदारांमार्फत त्याच्या ओळख परेडचे काम सुरू आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. दरम्यान हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असण्याची दाट शक्यता आहे.

मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

पार्सल बॅग पोलिसांना खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मदत करते

पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!