अहिल्यानगरमध्ये दोन मित्रांमधील चेष्टा मस्करी बेतली मित्राच्या जीवावर…

अहिल्यानगरः अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे होते. शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान खान (वय २०) या आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला चढवला. जखमी जिशान खान याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान जिशान खान या युवकाचा मृत्यू झाला आहे.

मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीचा आणि भांडणाचा cctv व्हिडीओ समोर आला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्ला करणारा आरोपी शमसुद्दीन खान हा पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला धुतले…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!