पुणे शहरात खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात नववर्ष आगमना दिवशी खुनी हल्ला करणाऱ्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पर्वती पोलिस स्टेशन हद्दितील पानमळा वसाहत येथे ०१/०१/२०२४ रोजी पहाटे ०२ / ३० वा. किरण बाळू निमसे यांनी त्यांचेवर तत्कालीन वादातुन त्याचे ओळखीचे चार जणांनी प्राणघातक हल्ला करुन त्याचे खुनाचा प्रयत्न केले बाबत पर्वती पो.स्टे येथे गुरनं.००२/२०२४ भा.दं.वि.कलम कलम ३०७,३२३,५०४,५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका ३७ (१) सह १३५. क्रि.लॉ.अमें.कलम ७ प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी पर्वती पोलिसांना आरोपी पकडणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी तपास पथकातील अंमलदारांची दोन पथके पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे यांचे करवी तयार करुन आरोपी पकडणे बाबत सुचना दिल्या.

तपास पथकातील अंमलदार दत्तवाडी भागात पेट्रोलिंग करत असताना पो.अं. पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, कुंदन शिंदे यांना त्यांचे खास बातमिदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे त्यांचे मित्रांना भेटण्यासाठी दत्तवाडीतील म्हात्रे पुला खाली येवुन थांबले आहेत. सदर बातमीचे अनुशंगाने पर्वती पोलिसांनी ताबडतोब सापळा रचून म्हात्रेपुला खाली आरोपी
१) हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे वय २० वर्षे रा. दत्तवाडी पोलिस चौकी मागे दत्तवाडी पुणे.
२) तुषार भरत कदम वय २३ वर्षे रा. हनुमान नगर, मनपा शाळे शेजारी दत्तवाडी पुणे.
३) आदित्य शंकर चव्हाण वय १८ वर्षे २ महिने रा. ९९९/१२९ जुना दत्तवाडी रोड स्वामी समर्थ मंदिरा जवळ दत्तवाडी पुणे
४) पियुश श्रीकांत गायकवाड वय २३ वर्षे रा. हनुमान नगर मनपा शाळेजवळ दत्तवाडी पुणे यांना शिताफीने पकडले त्याचे कडे विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा तत्कालीन वादातुन केल्याचे कबुली दिल्याने लागलीच त्यांना उपरोक्त गुन्हयात ०२/०१/२०२४ रोजी १७/१० वा अटक करण्यात आली असून, पुढील तपास
पोलिस हे करीत आहेत.सदरील आरोपी पैकी आरोपी हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे हा दत्तवाडी भारती विदयापीठ पोलिस स्टेशन रेकॉर्ड वरील सराईत आरोपी असुन त्यांनी त्या दिवशी अजुन कोठे गुन्हे केले आहेत काय या बाबत पर्वती पोलिसांकडुन सखोल चौकशी सुरु आहे.

सदरील कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त परि-३. संभाजी कदम, सहा. पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे, पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो.हवा. कुंदन शिंदे, पो.ना. अमित सुर्वे, पो.अं. पुरुषोत्तम गुन्ला, दया तेलंगे पाटील, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, अमोल दबडे अमित चिव्हे यांनी केली आहे.

kashmir
kashmir

पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पिस्टलसह केले जेरबंद…

पुणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान युवकाने गमावला जीव…

पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!