
Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रुबी हॉल रुग्णालयाच्या किडनी रॅकेटचा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, पॉर्शे अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरेच किडनी रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पोर्शे अपघात प्रकरणात आरोपी मुलासह त्याच्या मित्रांचे रक्त नमुने बदलणारे ससुन रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याचा पुण्यातील 2022 मधील किडनी रॅकेटमध्ये सक्रीय सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. किडनी प्रत्यारोपण प्रादेशिक समितीचे डॉ. अजय तावरे हे तत्कालीन अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना त्यांनी बनावट लोकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपणासाठी परवानगी दिल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी झालेल्या तपासात डॉक्टर तावरेचे नाव जाणीवपूर्वक तपास अधिकाऱ्यांकडून वगळलेले होते. या प्रकरणी मागील एका वर्षापासून पोर्शे कार अपघात प्रकरणातील गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असलेल्या डॉक्टर तावरे याचा ताबा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने घेतलेला आहे. तावरेची आता कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याला दोन जून पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, दाता सारिका, गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजीत मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँड, रेबिका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉक्टर अभय सद्रे, डॉक्टर भूफत भाटी, डॉक्टर हिमेश गांधी आणि समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. तावरेच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होऊ शकतात. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल…
हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

