पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…

पुणे : पुणे जिल्ह्यातील कनेरसर (ता. खेड) येथे ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष रामदास दौंडकर (वय 32) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतोष रामदास दौंडकर हे ग्रामपंचायत सदस्य होते. व्यवसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संतोष यांच्या चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. संतोष दौंडकर यांची हत्या झाल्याची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे. चार वर्षांपूर्वी कनेरसर गावच्या माजी उपसरपंचाचा देखील असाच खून झाला होता.

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…

पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!