मोठं मन! बिहारमध्ये कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा…

पाटणा (बिहार): बिहारमध्ये आंदोलनादरम्यान कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा सुपुत्र असून, मोठ्या मनाने त्यांनी कॉन्स्टेबलला माफ केले आहे. एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर या अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदमध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण लागले होते. आंदोलकांना अटकाव घालण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्जचे करण्याचे आदेश एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी दिले होते. मात्र या लाठीचार्जदरम्यान उपस्थित असलेल्या एसडीएम यांना पोलिसांनी न ओळखल्याने त्यांना यावेळी एका पोलिसांच्या काठीचा नकळत मार बसला. या घटनेमुळे मुळचे महाराष्ट्रातील मंगळवेढ्याचे रहिवासी असलेले श्रीकांत खांडेकर देशभरात चर्चेत आले आहेत. अजूनही या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रकरणी कॉन्स्टेबलवर नेमकी काय कारवाई होते याकडे सऱ्यांचे लक्ष लागले होते.

Video: पाोलिसाने लाठीचार्जवेळी उपजिल्हाधिकाच्या पाठीत टाकली लाठी…

पण, या प्रकरणात कुठलीही कारवाई न करण्याच्या सूचना श्रीकांत खांडेकर यांनी दिल्या आहेत. या वर बोलताना उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलने आपल्या लाठीचा गैरसमजातून वापर केला होता. ही मानवी चूक आहे. कॉन्स्टेबलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही.

दरम्यान, पांढरा शर्ट घातलेले एसडीएम आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असताना एका हवालदाराने त्यांना आंदोलक समजून त्यांच्यावर लाठीहल्ला केला. लाठीचा वार होताच आश्चर्यचकित झालेले एसडीएम माघारी फिरले. दरम्यान, शेजारी उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हवालदाराला हात देऊन थांबवले. नंतर एसडीएमने सांगितले की कॉन्स्टेबलने आपल्या लाठीचा गैरसमजातून वापर केला होता. ही मानवी चूक आहे. त्यामूळे कॉन्स्टेबलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचे एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी सांगितले आहे.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

राज्यात पुन्हा साडेसात हजार पदांसाठी पोलिस भरती; मुंबईत बाराशे पदं…

पोलिस चौकीमध्ये जुगार खेळणं अन् सिगारेट ओढणं पडलं महागात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!