आरोपीची पत्नी म्हणाली, अत्याचार झाल्याने नशीबवान समजलं पाहिजे…

चेन्नई : तमिळनाडूतल्या शिक्षण विभागाने विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या 14417 या क्रमांकाच्या 24/7 हेल्पलाइन सेंटरवर विद्यार्थी अनेक समस्या, प्रश्न मांडत असतात.

शिक्षण विभागाच्या या हेल्पलाइन क्रमांकावर एकदा एका गंभीर प्रकरणाबाबत फोन आला. या फोनवर एका मुलीने तिच्या बाबतीत घडलेली घृणास्पद घटना सांगताच समुपदेशिकेलादेखील धक्का बसला आहे. कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट सलमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मला एका मुलीचा फोन आला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने सांगितलं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हेल्पलाइन क्रमांकावर अशा प्रकारची समस्या ऐकायला मिळेल यावर विश्वास बसत नव्हता. बदनामीच्या भीतीने तिचे कुटुंबीय प्रकरण दाबून टाकण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे या मुलीने हेल्पलाइनवर कॉल केला होता.’

सलमा यांनी पुढे सांगितले,‘तमिळनाडूतल्या एका छोट्या गावातल्या विद्यार्थिनीने फोन करून मला सांगितलं, की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला आहे. तिने आई-वडिलांना याबाबत सांगितलं. त्यानंतर तिचे आई-वडील मला घेऊन शेजारच्या व्यक्तीकडे गेले असता, आरोपीची पत्नी त्यांच्याशी वाद घालू लागली.’ अत्याचार झाल्याने या मुलीने स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे,’ असं आरोपीची पत्नी म्हणाली. तक्रार केल्यास बदनामी होईल म्हणून तिचे कुटुंबीय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही मुलगी हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली.’

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!