
घाटंजी न्यायालयाकडून वादीचा दावा अंशतः मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी अंशतः मंजूर केला आहे. वादी तर्फे ॲड. नेताजी राऊत यांनी काम पाहिले.
घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक 33/2019 प्रतिवादी महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे विभागीय संचालक नागपूर, मुख्य अभियंता अमरावती, अधिक्षक अभियंता यवतमाळ व उप कार्यकारी अभियंता घाटंजी केले होते. घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील गट क्रमांक 1/1 व 1/2 या वडीलोपार्जीत शेत जमीन होती. वादी पंकज ठाकरे हा पदवीधर असुन शेती व्यवसायासोबत शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता. वादीकडे सन 2015-16 मध्ये 400 शेळ्या होत्या. त्याकरिता त्याने न्युट्रीफीड चारा उत्पादीत केला. तो चारा जमा करून भावाच्या शेतात गट क्रमांक 40/3 मध्ये ठेवले होते. सदर चा-याचे वजन 527 क्विंटल एवढे होते. दिनांक 9 जानेवारी 2016 रोजी विद्युत तारां मध्ये ढिलेपणा व झेलपणा असल्याने नैसर्गिक हवेच्या हेलकावणी मुळे तारांचे घर्षण होऊन शार्ट सर्कीट मुळे त्यांच्या ठिणग्या चा-यावर पडल्याने चारा जळुन वादीचे नुकसान झाले. या बाबत वादी पंकज ठाकरे यांनी पोलिस विभाग, तहसीलदार, संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी वादी पंकज ठाकरे यांचा दावा अंशतः मंजूर करून वादी हे प्रतिवादी यांचे कडुन रक्कम ₹ 4,18,000/- व त्यावर दिनांक 7 मार्च 2019 पासून ते रक्कम वसुल होई पर्यंत 9% व्याज दराने सदर रक्कम वसूल होऊन वादी पात्र असल्याचे आदेशीत केले आहे.
वादी पंकज ठाकरे यांच्या तर्फे ॲड. नेताजी राऊत यांनी काम पाहिले. तर प्रतिवादी विज वितरण कंपनी तर्फे ॲड. एम. एम. चौधरी यांनी काम पाहिले.

