
अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल…
मुंबईः अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. परंतु, काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने रात्री 1 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता.
दरम्यान, एक वर्षांआधी देखील गोविंदा रुग्णालयात दाखल झाला होता. पहाटे घरात तयारी करत असताना त्याच्या परवानाधारक रिवॉल्वरमधून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली होती. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. तो काही दिवस रुग्णालयात दाखल होता. त्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर गोविंदा पुन्हा त्याची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाला आहे.
अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचं मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात आहे. मला पुरावे मिळाल्याशिवाय मी काही बोलणार नाही असे, त्याची पत्नी सुनिताने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सुनिता अहुजा अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाची अनेक सीक्रेट बाहेर काढताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…
अभिनेते धर्मेंद्र 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी…
दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन…

