
मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचं वृत्ताने खळबळ….
मुंबई : प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे (वय ३२) हिचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनंतर खळबळ उडाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. तिच्या संपर्कात आलेल्यांना तिच्याकडून खूप प्रेम मिळालं. या कठीण काळात तिच्या खासगीपणा जपावा अशी आम्ही विनंती करतो.’ पूनम पांडेला सर्वायल कॅन्सर (Cervical cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असेही या पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र कालच जाहीर झालेल्या देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता. 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्याची घोषणा केली. त्यामुळे पूनम पांडेंच्या निधनाच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुटल चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, पूनम पांडे हिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर काही युजर्सना विश्वास बसत नसल्याने त्यांनी तिचं अकाउंट हॅक झालंय का अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, पूनम पांडे हिच्या मॅनेजरकडून तिच्या निधनाचे वृत्त खरे असल्याचं सांगितले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पूनम पांडे हिने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर ‘द जर्नी ऑफ कर्मा’ आणि ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’ अशा अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.
View this post on Instagram
प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा…

