
बडतर्फ IAS पूजा खेडकरला नोकराने बांधलं, आई वडिलांना केलं बेशुद्ध…
पुणे: आलिशान गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करत पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी मध्यरात्री उशिरा घडला आहे.
पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आपली मनस्थिती ठीक झाल्यानंतर आपण तक्रार दाखल करू, अशी माहिती पूजा खेडकरने पोलिसांना दिली.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पूजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलीसांना दिली आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह काही नोकर राहतात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला, असे पूजा खेडकर यांचे म्हणणे आहे.
पूजा यांनी बांधून ठेवलेल्या अवस्थेत दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले दुसऱ्या एका फोनवरून पोलीसांना फोन केला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलीसांचे पथक खेडकर यांच्या घरी पोहचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. पोलीसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाली आहे का? याचीही माहिती अद्याप पोलीसांना दिलेली नाही.
निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…
पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…
मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…
बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…

