
पुणे शहरात भूतानच्या युवतीवर सामूहिक अत्याचार…
पुणे: भूतान देशाची नागरिक असलेल्या युवतीवर (वय २७) पुण्यात सात जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.
भूतानची पीडित युवती 2020 पासून पुण्यात वास्तव्याला आहे. शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेश याने त्या पीडित युवतीची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडे याने पीडित युवतीला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन युवतींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. आताच्या प्रकरणात पोलिसांनी शंतनू कुकडे आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून शंतनू कुकडे याच्यासह ऋषिकेश नवले, जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक शिंदे, ॲड विपीन बिडकर, सागर रासगे, अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दासीन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत शंतनू कुकडे याने पीडित तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे याच्यासह ९ जण आरोपी आहे. पीडित तरुणी मूळची भूतानची आहे. काही वर्षांपूर्वी ती पुण्यात नोकरी आणि शिक्षणाच्या उद्देशाने आली होती. पुण्यात ती ऋषिकेशला भेटली. त्याच्यासोबतही तरुणीचे संबंध होते. ऋषिकेश याने या युवतीची ओळख शंतनूशी करुन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…
पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…
पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…
पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…

