
घाटंजी येथे दोन लाखाची घरफोडी करणा-या आरोपीस अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील संत मारोती महाराज वार्डात झालेल्या दोन लाखांच्या घरफोडीचा छडा घाटंजी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात लावला. आरोपी हे परिसरातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
१२ ते १३ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी पृथ्वी नंदु बिस्मोरे (वय २३) हे कुटुंबासह रक्षाबंधनासाठी नागपूरला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील पेटी फोडून सोन्या – चांदीचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याची एकदानी, चार अंगठ्या, ७.७४ ग्रॅम वजनाचे झुमके, सोन्याची माळ, पदक, मंगळसूत्र, लॉकेट आणि चांदीचे पैंजण असा तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज होता.
या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासा दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवून कारवाई केली. त्यात अमोल सदाशिव भोजवार (वय ३०, रा. संत मारोती वार्ड, घाटंजी) आणि प्रफुल्ल छगन मेश्राम (वय १९, रा. घाटंजी) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग होता.
घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय शाखेचे अमोल कोवे, प्रवीण तालकोकुलवार, निलेश भुसे आणि प्रणय खोब्रागडे या पथकाने केली. चोरीच्या घटनेचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करुन घाटंजी पोलिस स्टेशनची सलग तिसरी यशस्वी कामगीरी आहे.
हेडफोनमळे घात झाला; वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू…
थरार! मैत्रिण पाठलाग करतेय म्हणून वेगाने गाडी पळवली अन् गेला ५ जणांचा बळी…
धक्कादायक! दारूडा नवरा मध्यरात्री उठला अन् नको ते करून बसला…
बीड! पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखात जीव धोक्यात घालून वाचवले तीन युवकांचे प्राण…
महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पदभरती; पाहा कोणत्या पोस्टच्या किती जागा…

