पर्यवेक्षिका मनीषा झा ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना झाली कॅमेऱ्यात कैद…

निवारीः मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी प्रशासक मनीषा झा यांचा नोटा मोजतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागात खळबळ उडाली आणि अंगणवाडी सेविका भरतीमधील भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. व्हीडिओ समोर आल्यानंतर, विभाग आणि प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे. मनीषा झा यांच्याशी फोनवर संपर्क होऊ शकला नाही.

या व्हीडिओमध्ये मनीषा झा ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मोजताना दिसत आहे. तिच्यासोबत खोलीत इतरही अनेक लोक बसून अंगणवाडी सेविका भरतीवर चर्चा करत आहेत. इतकेच नाही, तर तहसीलदार आणि एसडीएम स्तरावर फाईल्सवर प्रक्रिया सुरू असल्याचा आणि पंचायत विभागाकडून आक्षेप नोंदवले जात असल्याचा उल्लेखही व्हिडिओमध्ये आहे. यावरून अंगणवाडी सेविका भरतीसाठी नोटांची अदलाबदल झाल्याचे सूचित होते.

मनीषा झा हिचे मूळ पद पर्यवेक्षकाचे आहे, परंतु सध्या तिच्याकडे ‘वन स्टॉप’च्या प्रभारी प्रशासक, भरती प्रक्रिया प्रभारी आणि लिपिक या जबाबदाऱ्याही आहेत. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर, अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेतील कागदपत्रे आणि गुणपत्रिकांबाबत गंभीर आरोप केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत झालेल्या अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांच्या नेमणुकांची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!