पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री घडली आहे. युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. युवती (वय २१) ही मित्रासोबत बोपदेव घाटात […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…
नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क […]
अधिक वाचा...पुणे शहरात चोरट्यांनी मध्यरात्री फोडलं मिठाईचं दुकान अन् काय चोरलं पाहा…
पुणे : पुणे शहरातील येरवडा भागात असलेले मिठाईचे दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडले आणि चोरट्यांनी दुकानातली अडीच किलो आंबा बर्फी चोरली आहे. मिठाई विक्रेते शैतान सिंह सवाई सिंह देवडा यांनी याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रर दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. येरवड्याच्या गोल्फ क्लब रोडवर शैतान सिंह यांचं नारायण स्वीट मार्ट म्हणून दुकान आहे. […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा व्यापार करणाऱ्या एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांची चोरीच्या उद्देशानेच हत्या झाल्याची शक्यता आहे. ब्रह्मनाथ हालोंढे यांच्या हत्येनंतर त्यांच्याकडील 25 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती; युवतीच्या मृतदेहाचे ३० तुकडे अन्…
बंगळुरू : श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशभर खळबळ उडाली होती. लिव इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिला होते. बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून, युवतीच्या (वय २९, रा. बिहार) मृतदेहाचे ३० तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! बुरखा घालून घरात शिरले अन् मुलींच्या डोळ्यादेखत केली हत्या…
पुणेः पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २०) रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय, […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
पुणे: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या केल्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात टाकून प्रियकर फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवानी सुपेकर (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके […]
अधिक वाचा...शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच […]
अधिक वाचा...वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर बलात्कार करून नंतर तीची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह गावाशेजारील जंगलामध्ये एका उंच टेकडीवर आढळून आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका […]
अधिक वाचा...वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण […]
अधिक वाचा...
