फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…
पुणे : पुणे शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) घडली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते वडकी भागात राहत होते. जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादासंदर्भात त्यांची केस पुणे जिल्हा न्यायालयात […]
अधिक वाचा...नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा…
नाशिक : नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई अन् मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या सावत्र मुलासोबत नको ते कृत्य केले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत सावत्र आईवर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील गायकवाड मळा परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाच्या सख्ख्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा […]
अधिक वाचा...सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार अन् दुसरीकडे अपघात…
कोल्हापूर : बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचाच अपघात झाल्याची घटना घडली. दोघेही जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दत्तात्रय रघुनाथ पवार (वय 32 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय 28 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…
बीड: एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पहाटेच्या सुमारास आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल हौसराव सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि […]
अधिक वाचा...नांदेड! बहिणीचा नाद सोड म्हणत युवकाचा चिरला थेट गळाच…
नांदेड: देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी मुलाला अटक केली आहे. शेळगाव येथील ग्रामपंचायत परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. संतोष माटलवार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...बीड! पत्रकाराच्या मुलाच्या हत्याकांडात आला नवा ट्विस्ट…
बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी बर्थ डे पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आले आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल […]
अधिक वाचा...रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये नर्सचा आढळला संशयास्पद मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एका नर्सचा वॉशरुममध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हर्षदा पद्माकर तायडे (वय २४) असे मृत नर्सचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सने इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हर्षदा तायडे […]
अधिक वाचा...पुणे! MIT Collage परिसरात आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या…
पुणे : पुण्यातील लोणी परिसरातील प्रसिद्ध एमआयटी (MIT) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष कामठे (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे […]
अधिक वाचा...
