शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…

मुंबई: शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार माहिम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली […]

अधिक वाचा...

प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…

पुणे : एका युवकाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री […]

अधिक वाचा...

भंडारा हादरलं! तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार…

भंडारा : भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात एका चिमुकलीला (वय ३) आमिष दाखवून एका नराधमाने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ची हाक देण्यात आली आहे. रोहित वासनिक […]

अधिक वाचा...

धक्कादायक! खासगी ट्रॅव्हलमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान महिलेचा दोनवेळा विनयभंग…

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील खासगी बसमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना एका महिलेचा दोनवेळा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत स्वत: आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करुन सरकारला प्रश्न केला आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप […]

अधिक वाचा...

महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; भावूक सुसाईड नोट…

नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अकोल्याच्या एका महिला क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अदिती मोरेश्वर चौखंडे (वय १७) असे या मृत महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या भावाच्या नावाने एक भावूक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठा हळहळ व्यक्त केली […]

अधिक वाचा...

नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर आजोबाने केला अत्याचार…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भादलवाडी गावात बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत आजोबानेच अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आजोबाला तातडीने बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी ही अल्पवयीन असून बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहे. आरोपीला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरीही त्याने […]

अधिक वाचा...

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…

पुणे: ‘मकोका’अंतर्गत अटकेत असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परत नेत असताना वाटेतच त्यांची निर्घृण हत्या करण्याचा कट ‘ठोंबरे टोळी’ने रचला. यासाठी त्यांनी थेट आंदेकर असलेल्या पोलिसांच्या गाडीचाच पाठलगा सुरू केला. शिवाजीनगर न्यायालयापासून ते थेट चाकणपर्यंत पोलिसांच्या गाडीचा थरारक पाठलाग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हा मोठा कट पुणे पोलिसांच्या […]

अधिक वाचा...

प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा म्हशीच्या गोठ्यात आवळला गळा अन्…

कोल्हापूर : प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याने माजी सरपंच महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेखा शिवाजी न्यारे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या खून प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकराने शिरगाव येथे खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी […]

अधिक वाचा...

मुलीने स्थळ नाकारलं अन् शेजाऱ्याच्या मुलावर प्रेम कळलं, आईने दाबला गळा…

उल्हासनगर : मुलीचे प्रेम संबंध मान्य नसलेल्या आईनेच आपल्या १९ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. स्वत: आईनेच कबुली दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली. अमृता गरुड असे मृत मुलीचे नाव तर आशा […]

अधिक वाचा...

नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर रविवारी (ता. २६) मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिनेश गावित आणि त्यांची पत्नी कीर्ती गावित हे दोघे त्रिशा गावित हिच्यासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. पिळकोस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!