एका चपलेमुळे गेली 11 पोलिसांची नोकरी; कशी पाहा…

कल्याण: एका चप्पलेमुळे तब्बल 11 पोलिसांची नोकरी गेल्याची विचित्र घटना घडली आहे. न्यायालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे पडसाद आता उमटले असून या एका चप्पलेमुळे 11 पोलिसांचे निलंबन झाले आहे. कल्याणच्या उपायुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात 21 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु होते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या किरण […]

अधिक वाचा...

पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…

कोल्हापूर : पोलिसांनी जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून दीपक शंकर जाधव (वय 44, सहा. पोलिस निरीक्षक, गांधीनगर पोलिस ठाणे, (सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…

मुंबई : विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी मंगळवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिकांत भद्रेशेट्टे यांच्या मागे पत्नी […]

अधिक वाचा...

पैसे न घेणारे पोलिस आता बोटावर मोजण्याएवढेच: मीरा बोरवणकर

छत्रपती संभाजीनगर : मी तरुण आयपीएस अधिकारी होते, तेव्हा बोटावर मोजता येतील एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत होते. आता मात्र बोटावर मोजावे एवढेच पोलिस पैसे घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. पण, या परिस्थितीला राजकारणी आणि जनता जबाबदार आहे, असे निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी […]

अधिक वाचा...

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]

अधिक वाचा...

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

बंगळूरू : कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात आयपीएस (IPS) अधिकारी हर्ष वर्धन यांचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हर्ष वर्धन यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. हर्ष वर्धन हे मध्य […]

अधिक वाचा...

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

सिंधुदुर्गः एक महिनाभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय 55, मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा. भांडूप) यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद आचरेकर यांच्या खुनाची बातमी समजताच कोळोशी परिसर हादरुन गेला. विनोद आचरेकर यांच्या मागे आई, पत्नी, […]

अधिक वाचा...

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी…

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालक झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्य निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले होते, पण आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला आपल्या मूळ पदावर आल्या आहेत. रश्मी शुक्ला यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर आता […]

अधिक वाचा...

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

बीड: बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा आणि दागिने सापडले असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर येथील रहिवाशी असणाऱ्या एका पोलिस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल 2 कोटी 7 लाख 31 हजार रुपयांची माया कमावल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा...

टपाली मतदान करताना फोटो काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई…

मुंबई: पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर 20 नोव्हेंबर रोजी असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यादरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका शिपायावर गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!