अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

अहमदनगर: पती-पत्नीच्या भांडणात बापाने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (ता. 6) घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38, रा. आळसुंदे, कर्जत) असे बापाचे नाव आहे. तर ऋतुजा (वय 8) आणि वेदांत (वय 4) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. गोकुळ क्षीरसागर […]

अधिक वाचा...

पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…

पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला असून, पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आले आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे ISIS या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

ठाणे: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळून झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. ठाणे शहराजवळील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम […]

अधिक वाचा...

दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…

पुणे: पुणे शहरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला आहे आणि या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याचे देखील समोर आले आहे. कोथरुड भागात 18 जुलै रोजी […]

अधिक वाचा...

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

सातारा: यवतेश्वर घाटात कार अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गायत्री आहेरराव (वय 21) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दुर्दैवी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी गायत्रीचे वडील दिपक आहेरराव यांचेही अपघातामध्येच निधन झाले होते. सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पुणेः www.policekaka.com व www.mahabharat.news च्या बातम्यांसाठी वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषताः विविध Whatsapp ग्रुपवरून बातम्या शेअर होत आहेत. ‘पोलिसकाका’वरील घडामोडी जाणून घेण्यासाठी फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा. पोलिसकाका / महाभारतच्या बातम्या वाचण्यासाठी 90227 97223 हा मोबाईल क्रमांक तुमच्या व्हॉट्ऍप ग्रुपवर ऍड केल्यास अथवा, https://chat.whatsapp.com/D1TGh4Cx0ET9lBjZNKdbkV या लिंकवर क्लिक केल्यास बातम्या वाचायला […]

अधिक वाचा...

संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

अमरावती: महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्त्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा […]

अधिक वाचा...

शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…

छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर […]

अधिक वाचा...

बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; सात ठार; पोलिसांची माणुसकीचे दर्शन…

बुलढाणा: मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 प्रवाशांना अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या युवकाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!