पुणे शहरात जड/अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आणि मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात दररोज सकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत जड व […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरण! उज्ज्वल निकम यांची नियुक्तीमुळे दणाणले अनेकांचे धाबे…

मुंबईः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ दिवसांच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…

जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे. व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राच्या सुपुत्राला मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान! आई धाय मोकलून रडली; राष्ट्रपतीही गहिवरल्या…

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले. प्रवीण प्रभाकर जंजाळ (रा. अकोला) यांना गेल्यावर्षी जुलै महिन्यात जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या (Mahar Regiment) पहिली बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. दिल्लीत प्रवीण जंजाळ यांना जेव्हा मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले तेव्हा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…

सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे […]

अधिक वाचा...

नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानची सर्वात मोठी कबुली; खळबळजनक खुलासे…

नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे. तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची […]

अधिक वाचा...

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

पुणे : सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे चंदननगर परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! महाविद्यालयीन युवतीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार; Video बनवला अन्…

कोल्हापूर : एका १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर चार जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला असून, आरोपींनी तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १० महिने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आहे. याप्रकरणी मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक केली आहे. आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे, […]

अधिक वाचा...

पुण्यातील नामांकित IT कंपनीत नेमकं काय घडलं? रात्रीत गेले 700 जणांचे जॉब…

पुणे: हिंजवडीतील एका मोठ्या IT कंपनीने अचानक कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याने शेकडो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इंटर्न्सची कष्टाची डिपॉझिट रक्कम थकवून पोबारा केल्याने आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार हिंजवडी फेज-२ मधील ‘गेराज इम्पेरियम राईज’ या इमारतीतून कार्यरत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!