काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन घरफोडी चोरांना ठोकल्या बेड्या…

पुणे : काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ या कालावधीत गंगेश्वर यादव यांच्या तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर येथील बंद घराचा दरवाजाचा कोयंडा उपसून अज्ञात व्यक्तीने घरात […]

अधिक वाचा...

पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…

पुणे: पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस […]

अधिक वाचा...

घरमालक-भाडेकरूंसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कडक नियम करणार लागू…

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. सहा दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणारा नवा ‘आयकर कायदा, २०२५’ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे. कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज (फॉर्म्स) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…

पुणे: पुणे शहराच्या विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून उडी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात आगीचे रौद्र रूप, ६० वाहने जळून खाक…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात आज (सोमवार) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ६० वाहने जळून खाक झाली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहने जळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…

सोलापूर : सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून प्रेम अंकुश जाधव (वय 28) याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे. प्रेम अंकुश जाधव […]

अधिक वाचा...

पोलिस कर्मचाऱ्याला म्हणाला दोन दिवसांत बघून घेतो अन् रस्त्यावरच झोपला…

छत्रपती संभाजीनगर : पोलिस कर्मचारी वाहतूकीचे नियंत्रण करत असताना मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी…

मुंबईः सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’च्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. विशेष शाखेचे उपायुक्त […]

अधिक वाचा...

FASTag बाबत मोठा निर्णय; पाहा नवे नियम कधीपासून लागू…

पुणे : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मार्फत केली जाणार आहे. टोल वसुली प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे. टोल संकलनात पारदर्शकता वाढवणे, वाहतुकीचा वेग कायम राखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! वाढदिवसच ठरला आयुष्यातला शेवटचा दिवस; यंत्रात स्कार्फ अडकला अन् गेला जीव…

पुणे : भोर तालुक्यातील कुरंगवडी गावात वाढदिवसाचा दिवशीच महिलेचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतातील धान्यभरड यंत्रात स्कार्फ अडकल्याने झालेल्या दुर्घटनेत शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुरंगवडी गावात शनिवारी (ता. २१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शुभांगी राऊत या आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात वाटाणा आणि मसूर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!