अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…
मुंबई : हरियाणा पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बिश्णोई गँगचा गुंड सुक्खा कालुया याला पानिपतमधून ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई शहर पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सुक्खा कालुया याने सलमान खानची सुपारी घेतली होती. त्याने सलमान खानच्या घराची रेकीदेखील केली. अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर पहाटेच्या सुमारास एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता. […]
अधिक वाचा...जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन…
मुंबई : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे आज (सोमवार) निधन झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. अतुल परचुरे यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले. शिवाय चित्रपटात देखील त्यांच्या वेगवेगळ्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध मॉडेलची हत्या; नग्नावस्थेत सापडला मृतदेह…
मेक्सिको : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध मॉडेलचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सिंडी एलिजाबेथ हर्नांडेट पेरेज (वय ३६) असे तिचे नाव असून ती मेक्सिको येथील मॉन्टेरी शहरात राहात होती. तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात मिळाली आहे. तिच्या हत्येची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंडी ही शुक्रवारी आपल्या तीन वर्षाच्या […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचं बळः सुबोध भावे
पुणेः ‘एक चित्रपटामध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, डबिंग करत असताना अधिकाऱ्याच्या भूमिकेला अनेक प्रयत्न करूनही साजेसा असा आवाज निघत नव्हता. अखेर, पोलिस अधिकाऱ्याची वर्दी घातली आणि पहिल्याच टेकमध्ये घशातून आवाज बाहेर पडला. पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचं बळ असते, अशी आठवण अभिनेता सुबोध भावे याने सांगितली. ‘स्पाईन-वाईज’ या मिहाना पब्लीकेशनच्या पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेता सुबोध भावे […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
मुंबई : बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली असून, क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाही. पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेकीचा जवाब नोंदवला आहे. गोविंदाला रुग्णालयातून […]
अधिक वाचा...अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर क्रीटी केअर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गोविंदा […]
अधिक वाचा...पोर्न स्टार रिया बर्डे हिला पोलिसांनी केली अटक; धक्कादायक कारण…
मुंबईः पॉर्न स्टार रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहिल्याचा आरोप असून, या आरोपामुळे तिला उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भारतीय पोर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. या प्रकरणी आयपीसी 420, 465, 468, 479, 34 आणि 14अ अन्वये […]
अधिक वाचा...अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घटस्फोट घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत उर्मिला हिने सध्या मौन बाळगले असून, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उर्मिला मातोंडकर हिने लग्नाच्या 8 वर्षानंतर पती मोहसिन अख्तर मीरपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सहमतीने घेण्यात आला नाही, असेही सांगितले जात आहे. मात्र पूर्ण विचार करुन उर्मिलाने […]
अधिक वाचा...अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…
हैद्रबाद (आंध्र प्रदेश): मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह […]
अधिक वाचा...भारताची सौंदर्यवती 2024 ब्युटी पेझेंट चे पुणे येथे आयोजन…
पुणेः भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुप चा भारताची सौंदर्यवती व भारताचा सम्राट 2024 कडे बघितले जात आहे. पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, हा सोहळा लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर […]
अधिक वाचा...
