पुणे शहरात महिला घरात असताना धडकली बंदुकीची गोळी अन्…
पुणे : कोथरूडच्या भुसारी कॉलनीत बंदुकीच्या गोळी थेट घराच्या खिडकीत जाऊन अडकल्याची घटना घडली आहे. गोळी नेमकी कुठून आली? याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स या डोंगराच्या शेजारीच एक सोसायटी आहे. एक महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात बसलेली होती. बाल्कनीला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचेचा जोरात आवाज झाला. आवाज […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
नाशिक: नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलिस दलात खळबळ […]
अधिक वाचा...पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा […]
अधिक वाचा...Video: हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवानांकडू अनोखी मानवंदना!
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती सोमवारी (ता. १९) मोठ्या […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, ०२ पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे १७/०२/२०२४ रोजी दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहा पो निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना सायंकाळी […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगार यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पाऊल उचलणेबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे अपर पोलिस आयुक्त गुन्हे पुणे व पोलिस उप आयुक्त गुन्हे […]
अधिक वाचा...पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…
सातारा : पाचगणीच्या खिंगर येथील ‘पाचगणी टेन्ट हाऊस’ रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि दहा ते बारा बारबालांसह 48 जणांना रविवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस हॉटेलवर बारबाला नाचवल्या प्रकरणी दहा ते बारा मुलींसह 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झाली ते सर्व […]
अधिक वाचा...पत्नीची संशयावरून केली हत्या अन् शीर घेऊन रस्त्यावर लागला नाचू…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवऱ्याने संशयावरून पत्नीची हत्या केली आणि शीर कापून रस्त्यावर फिरत होता. संबंधित प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. याबाबतची माहिती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसारा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी असलेल्या पतीचे नाव अनिल असे आहे. अनिल […]
अधिक वाचा...नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
नाशिक : नाशिक शहरातील रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका कॉलेजमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत. इम्रान हानीफ पठाण (वय 28 रा. साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरात दिवसा व रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांच्या […]
अधिक वाचा...पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…
यवतमाळ: विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन […]
अधिक वाचा...
